• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जानेवारीपासून खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार: कुलगुरु प्रा. महानवर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2024
in इतर घडामोडी
0
जानेवारीपासून खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार: कुलगुरु प्रा. महानवर

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, डॉ. केदारनाथ काळवणे व अन्य.

0
SHARES
1
VIEWS

सोलापूर विद्यापीठात खेळाडू, प्रशिक्षकांचा झाला सन्मान
संगमेश्वर कॉलेजने पटकाविले प्रा. पुंजाल फिरता चषक!

सोलापूर, दि. 29- जीवनात खेळास अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे खेळाडूंचे सामाजिक महत्व वाढत असते. सोबतच खेळातील प्राविण्‍यामुळे शहराचे, प्रांताचे आणि राष्ट्राचे नाव उंचावत असते. अशा या खेळाडूंमुळे विद्यापीठास यंदाच्या वर्षी 33 पदके प्राप्त झाली. आता या खेळाडूंना पुढील डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून विद्यापीठातील इंडोयर मल्टीपर्पज हॉलमध्ये जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थित होती. भारतीय विश्वविद्यालय संघ आयोजित वेस्ट झोन, साऊथ वेस्ट झोन, ऑल इंडिया, खेलो इंडिया व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव तसेच आंतरविद्यापीठ विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाला पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा व त्यांच्या संघाने हा पुरस्कार स्वीकारला.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकाचा खेळाशी संबंध येतो. आज ग्रामीण भागातील विविध प्रकारचे खेळ मोबाईलच्या अतिवापरामुळे लोप पावत आहेत. खेळामुळे चांगला व्यायाम होतो तसेच शारीरिक व मानसिक संतुलनही चांगले राहते. येथील खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

ब्रिजमोहन फोफलिया म्हणाले की, आई, वडील व गुरुजनांमुळे चांगला विद्यार्थी व चांगला खेळाडू घडतो. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने खेळामध्ये चांगली प्रगती केली आहे. आई-वडिलांच्या कष्टातून घडल्यानंतर विद्यार्थी व खेळाडू यशस्वी होत असतो. माणूस मोठा झाल्यानंतर जन्म दिलेल्या आई-वडिलांना विसरू नये. त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करावी. आज समाजात संस्काराची हानी होत असल्याबद्दल फोफलिया यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. खेळाडू विद्यार्थिनी संतोषी देशमुख यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा आणि विविध पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे संचालक, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा ममता बोल्ली यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.

Previous Post

मविआला महाराष्ट्रात एवढ्या जागा मिळतील, नाना पटोलेंचा दावा

Next Post

संत नामदेव रथ आणि सायकल यात्रेचे परंपरेनुसार स्वागत करु : राज्यपाल गुलाबचंद कटारिया

Related Posts

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील
इतर घडामोडी

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

September 23, 2026
पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न

September 23, 2026
विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.
इतर घडामोडी

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

September 23, 2026
Next Post
संत नामदेव रथ आणि सायकल यात्रेचे परंपरेनुसार स्वागत करु : राज्यपाल गुलाबचंद कटारिया

संत नामदेव रथ आणि सायकल यात्रेचे परंपरेनुसार स्वागत करु : राज्यपाल गुलाबचंद कटारिया

ताज्या बातम्या

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026