दौंड हे मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून सोलापूर, पुणे नगर व मराठवाडा परिसरातील प्रवाशांचे मागणी विचारात घेता सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर पासून वंदे भारत एक्सप्रेस ला दौंड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक 22 22 6 सोलापूर सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे दौंड येथे सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी आगमन होणार असूू सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ती पुढे पुण्याकडे रवाना होईल. विरुद्ध दिशेने धावणारी ट्रेन क्रमांक 22 22 5 सीएसएमटी सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस दौंड येथे रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी येईल आणि आठ वाजून पंधरा मिनिटांनी सोलापूर कडे प्रस्थान करेल.दौंड स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा दिल्याने प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

