• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 5, 2022
in मुख्य बातमी
0
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन
0
SHARES
1
VIEWS

जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत केले. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.२० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन करुन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दर्शन घेतले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते. तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी श्री.परीट यांनी भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले पालखीचे सारथ्य
सराटी (ता. इंदापूर) येथून पालखी माळशिरस तालुक्यातील अकलूज हद्दीत आल्यानंतर पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनाने केले. पालखीच्या स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.

अकलूज नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत
अकलूज येथील गांधी चौकात नगरपरिषदेच्यावतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे यांच्यासह अकलूज परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसला होता. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले. या रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते, पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंना विठ्ठल-रुक्मिणी महापूजेसाठी आमंत्रण

Next Post

‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी यांची शस्त्राने भोसकून हत्या

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी यांची शस्त्राने भोसकून हत्या

'सरल वास्तू'चे चंद्रशेखर गुरुजी यांची शस्त्राने भोसकून हत्या

ताज्या बातम्या

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026