• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल : पंतप्रधान मोदी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 8, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल : पंतप्रधान मोदी
0
SHARES
0
VIEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी महामार्गांचे झाले ऑनलाईन भूमीपूजन

पंढरपूर: आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे भूमिपूजन होत नाहीये. हे केवळ मार्गाचे भूमिपूजन नाहीये. तर पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. तर पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात दाखल झाले होते.

याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मोदींनी राम कृष्णहरी… राम कृष्णहरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्याने सांगितलं आहे पंढरपूरला आनंदाचंही प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं मोदी म्हणाले.

दिंडीत ना जातपात, ना भेदाभेद
दिंडीत जातपात नसते. भेदाभेद नसतो. सर्व वारकरी गुरुभाऊ आहे. वारकऱ्यांची एकच जात आहे. एकच गोत्रं आहे. ते म्हणजे विठ्ठल गोत्रं आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते. पंढरपूरची अभा, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे.

ही युग संतांची भूमी
आपण म्हणतो ना… माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिवरी. माझं पहिलं नातं गुजरातच्या द्वारकाशी आहे. माझं दुसरं नातं काशीशी आहे. मी काशीचा रहिवासी आहे. आणि आपल्यासाठी पंढरपूर ही दुसरी काशी आहे. या भूमीत आजही देवाचा वास आहे. सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात असल्याचं संत नामदेवांनीही सांगितलं आहे. या भूमीने अनेक संत दिले. युग संत निर्माण केले. या भूमीने भारताला नवं चैतन्य दिलं, ऊर्जा दिली, असंही त्यांनी सांगितलं. भारतात नेहमीच अशा विभूती जन्माला आल्या. त्यांनी देशाला आणि जगालाही मार्गदर्शन केलं.

Previous Post

पंढरपूर : महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले नितीन गडकरी यांचे स्वागत

Next Post

दीड हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला केले जेरबंद

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
दीड हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला केले जेरबंद

दीड हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला केले जेरबंद

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026