• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार  याचिकेत राज्याने सहभागी व्हावे – आ. सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
May 14, 2021
in मुख्य बातमी
0
मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार  याचिकेत राज्याने सहभागी व्हावे – आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणा संदर्भातील निकालानंतर महाविकास आघाडी सरकारने आपला उरला सुरला आत्मविश्‍वासही गमावला असून आता केवळ नाचक्की टाळण्याची चालढकल सुरू झाली आहे. केंद्राच्या फेरविचार याचिकेनंतर सुटका झाल्याचा सूर लावणारे ठाकरे सरकार मराठा आरक्षणासंबंधी खरोखरच गंभीर आहे का ही शंका बळावली आहे. दीर्घकाळ टांगणीवर राहिलेल्या या सामाजिक महत्वाच्या मुद्याचे गांभीर्य ओळखून चालढकल करण्यापेक्षा राज्य सरकारने केंद्राच्या फेरविचार याचिकेत सहभागी व्हावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शुक्रवारी केले आहे.
 हा न्यायालयीन लढा म्हणजे केवळ वकिलांच्या फौजांना भरमसाठ मानधन देण्याची संधी नाही हे लक्षात घेऊन राज्य सरकारने वेळकाढूपणा थांबवावा आणि केवळ समित्या नेमून किंवा भेटीगाठी, निवेदनांचे कागदी घोडे नाचवून मराठा समाजाची दिशाभूल करण्याऐवजी निर्णायक लढ्यासाठी केंद्र सरकारला कसे सहकार्य करणार ते राज्य सरकारने जाहीर करावे.  102 व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्य सरकारांना आरक्षण देण्याचे अधिकार कायम राहतात ही बाब केंद्राने संसदेत आणि न्यायालयातही या आधी निःसंदिग्धपणे स्पष्ट केली आहे. आता  फेरविचार याचिकेद्वारे यावर सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम शिक्कामोर्तब व्हावे यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. ही भूमिका राज्य सरकारने अगोदरच सर्वोच्च न्यायालयात ठामपणे मांडली असती तर आरक्षण टिकले असते. मात्र ठाकरे सरकार या युक्तिवादात कमी पडल्याने  हार पत्करण्याची वेळ राज्यावर आल्याचे आ. देशमुख यांनी म्हटले आहे.
 आरक्षणाचा हा मुद्दा म्हणजे, जितेंद्र आव्हाड विरुद्ध करमुसे किंवा अर्णब गोस्वामी, कंगना राणावत आदी खटल्यांप्रमाणे कोणा एका व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा नाही किंवा त्यासाठी केवळ सरकारी तिजोरीतून पैसे उपसून वेळकाढूपणा करण्याएवढा सामान्य नाही. राज्यातील मोठ्या समाजिक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा या खटल्याच्या भवितव्याशी निगडीत असल्याने कातडी बचाऊपणा न करता राज्य सरकारने केंद्राच्या याचिकेत पक्षकार म्हणून सहभागी होऊन अगोदर झालेली राज्याची नाचक्की धुवून काढावी. मागासवर्ग आयोगाच्या नियुक्तीत चालढकल करून राज्य सरकारने आपला बेजबाबदारपणा दाखविला आहे. राज्य सरकारने सातत्याने घेतलेल्या कचखाऊ धोरणामुळेच हा प्रश्‍न लोंबकळत राहिला व चिघळत गेल्याचे आ. देशमुख म्हणाले.

 फडणवीस सरकारच्या सवलती त्वरित अंमलात आणा
  आता केंद्रामुळे  मराठा आरक्षण प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहे. मात्र केवळ राजकारणासाठी खोडा न घालता, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. या प्रश्नाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या काळात मराठा समाज सवलतींपासून वंचित राहू नये याकरिता फडणवीस सरकारने लागू केलेल्या सवलती त्वरित अंमलात आणाव्यात, अशी अपेक्षाही आ. देशमुख यांनी व्यक्त केली.

Previous Post

वॅक्सिन ऑन कॉल पद्धती जिल्हाभर राबवा -पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026