• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरकरांनी अनुभवला धमाल, संवेदना अन् जाणिवेचा त्रिवेणी संगम

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूरकरांनी अनुभवला धमाल, संवेदना अन् जाणिवेचा त्रिवेणी संगम
0
SHARES
1
VIEWS

उलगडली ‘बाईपण भारी देवा’ च्या पडद्यामागची कहाणी : ‘प्रिसिजन गप्पा’ ला रसिकांची दाद

सोलापूर : धमाल, संवेदना अन् सामाजिक जाणिवेचा त्रिवेणी संगम सोलापूरकर रसिकांनी शनिवारी अनुभवला. निमित्त होते श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात सुरू असलेल्या ‘प्रिसिजन गप्पा’ च्या दुसऱ्या दिवशी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील कलाकारांसोबतच्या संवाद कार्यक्रमाचे.

‘प्रिसिजन गप्पा’ चा दुसरा दिवस ख्यातनाम अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याशी संवादाने रंगला. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर- जोशी यांनी कलाकारांना बोलते केले.

शनिवारी प्रारंभी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, प्रसिद्ध सूत्रसंचालक अभिनेत्री डॉ. समीरा गुजर- जोशी तसेच प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक करण शहा, संचालक रवींद्र जोशी, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाईपण भारी देवा चित्रपटातील प्रत्येक पात्र समाजातील सर्वसामान्य स्त्रीशी जोडले गेले आहे. यातील पात्रे, संवाद, कथानक हे महिलांना आपले वाटते. यामुळेच प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आणि या चित्रपटाची प्रसिद्धी आमच्यापेक्षा अधिक प्रेक्षकांनीच केली.

रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, मला अभिनयाचे धडे वडिलांच्या प्रेरणेने बालनाट्यापासूनच मिळाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतल्यानंतर अभिनय अधिक सकस झाला. बाईपण भारी देवा चित्रपटाच्या अतिशय वेगळ्या कथानकामुळे अभिनय करताना खूपच मजा आली. याप्रसंगी रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या अभिनयाच्या प्रदीर्घ प्रवासातील अनेक किस्से प्रेक्षकांना सांगितले.

अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अपघातांच्या मालिकेचे वर्णन सांगताना सभागृह सुन्न झाले. मनात आत्महत्येचे विचार येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना आईने दिलेला आत्मविश्वास आणि रंगभूमीबद्दलची ओढ यामुळे इतका मोठा प्रवास मी करू शकले असे सुकन्या कुलकर्णी यांनी सांगताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट करून त्यांच्या अभिनय प्रवासाचे कौतुक केले. यावेळी सुकन्या कुलकर्णी यांनी बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचे विनोदी प्रसंग सांगून रसिकांना खळखळून हसवले.

महिला सबलीकरणाचा विषय केवळ गंभीरपणे न मांडता हलक्या फुलक्या पद्धतीनेही मांडता येतो हे यातून कळाले, असे अभिनेत्री डॉ. समीरा गुजर – जोशी यांनी सांगताच प्रेक्षकांनी टाळ्यांनी दादा दिली.

याप्रसंगी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक करण शहा, संचालक रवींद्र जोशी, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा आदी उपस्थित होते.

आज पारंपरिक राजस्थानी संगीताची मेजवानी

प्रिसिजन गप्पांमध्ये उद्या रविवारी राजस्थानी पारंपरिक संगीताचा मागोवा घेणारा ‘पधारो म्हारे देस’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. जैसलमेर येथील राजस्थानी कलाकार बादल खान, मुलतान खान, कुटाला खान आणि हाकिम खान या कलाकारांशी संवाद साधत त्यांचा प्रवास जाणून घेण्यात येईल. तसेच यावेळी राजस्थानी संगीतही ऐकण्याची संधी सोलापूरकर रसिकांना मिळणार आहे.

Tags: Bai pan bhari devaPrecision gappasensation and perceptionSolapur news
Previous Post

समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

Next Post

सहा तासाच्या आत पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघडकीस

Related Posts

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन
इतर घडामोडी

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

November 12, 2026
सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

November 12, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
इतर घडामोडी

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
Next Post
सहा तासाच्या आत पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघडकीस

सहा तासाच्या आत पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघडकीस

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026