• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना…

by Yes News Marathi
December 9, 2025
in इतर घडामोडी
0
महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना…
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असून, त्यानुसार आज महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगरदरम्यान असलेला १०३ वर्षे जुना ब्रिज पाडण्यात येणार असून, ब्रिज पाडण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी आवंतीनगर परिसरामध्ये ५४ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्तांनी आज या ५४ मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याची सध्याची स्थिती, कामाचा वेग, मुरूम व डांबरीकरणाची प्रगती याबाबत माहिती घेत ब्रिज पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदारास दिले. कामात कोणतीही विलंबता होऊ नये, गुणवत्ता आणि सुरक्षा निकष पाळून कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेशही आयुक्तांनी दिले.

याच अनुषंगाने, पर्यायी मार्ग म्हणून निश्चित करण्यात आलेल्या डोंगाव रोडची देखील आयुक्तांनी पाहणी केली. काही ठिकाणी रस्त्याच काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून, रस्ता वाहतुकीस सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच पर्यय मार्गांवरील लाईटचे फोल शिप्ट करणे आणि अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्या.

यानंतर आयुक्तांनी विष्णू चाळ येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. स्वच्छता, व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि वापरातील सुविधा या संदर्भात काही सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यावर तत्काळ आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

तसेच दहीठणा गाव येथील जुने शौचालय काम पूर्ण झाले असून त्या सार्वजनिक शौचालयाची प्रत्यक्ष पाहण्यात आले. कामाची गुणवत्ता, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेऊन शौचालयाचे काम समाधानकारक असल्याचे निरीक्षण करण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका आकूलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी सरकाझी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,सह. अभियंता प्रकाश दिवाणजी, सागर करोसेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिका शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता व नागरी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कामांची नियमित पाहणी आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

Previous Post

राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापुरात निघाली वारकरी दिंडी..

Next Post

१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन…

Next Post
१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन…

१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In