• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2026
in मुख्य बातमी
0
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र व कर्नाटकातील १६० सायकल रायडर्सचा सहभाग; पंढरपूर ते पंजाबमधील घुमाण असा २,५०० किलोमीटरचा प्रवास

पंढरपूर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे २ हजार ५०० किलोमीटरच्या सायकल वारीचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे करण्यात आला. संत नामदेव महाराजांचे विचार आणि संत साहित्याचा प्रसार करणारी ही सायकल वारी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमिटी, श्री क्षेत्र घुमाण (पंजाब), सायकल रायडर्स असोसिएशन आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२ पासून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.

दि. २१ नोव्हेंबर रोजी सुरू झालेली ही रथयात्रा व सायकल वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांतून प्रवास करून दि. १३ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचणार आहे. तेथे सायकल वारीचा समारोप होणार आहे. त्यानंतर हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतून प्रवास करीत दि. २१ डिसेंबर रोजी रथयात्रा पुन्हा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

या रथयात्रा व सायकल वारीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सुमारे १६० सायकल रायडर्स सहभागी झाले आहेत. यंदा सहभागी रायडर्सची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.

संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या शुभारंभप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार राजू खरे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सायकल रायडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कोकणे, यांच्यासह सायकल रायडर्स उपस्थित होते.

Previous Post

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

Next Post

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

Related Posts

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे
मुख्य बातमी

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!
मुख्य बातमी

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!

November 20, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!
मुख्य बातमी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026
राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
मुख्य बातमी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 19, 2026
Next Post

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026