• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 25, 2026
in इतर घडामोडी
0
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
0
SHARES
4
VIEWS

कवी सौमित्र यांना दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार प्रदान

सोलापूर- दि. २४- कविवर्य दत्ता हलसगीकर यांची कविता निखळ, नितळ, सात्विक आणि सकारात्मक होती. त्यांनी आपल्या कवितांमधून माणुसकीचे पसायदान मागितले. आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्रक्षेपणातून त्यांच्या कविता २२ भाषांमध्ये प्रसारित झाल्या. त्यांच्या कवितेमुळे मराठी साहित्याला असामान्य उंची प्राप्त झाली, असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी केले.

​महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात येणारा ज्येष्ठ कवी स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार नामवंत कवी व अभिनेते किशोर कदम यांना सोमवारी सुनील शिनखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा होत्या.

​रोख दहा हजार रुपये, चांदीचे कमळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री हिरचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.शिनखेडे म्हणाले, दत्ता हलसगीकर हे सदाबहार व्यक्तिमत्त्वाचे कवी होते. उज्जल ६० वर्षे त्यांनी कविता लिहिल्या. त्यांच्या कवितेत गरिबांचे चांदणे होते; मात्र दुःखाविषयी त्यांनी कधीही तक्रार केली नाही. उलट प्रेम आणि करूणा हेच त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय होते.

​पुरस्कारप्राप्त कवी किशोर कदम यांच्या काव्यप्रतिभेचेही शिनखेडे यांनी कौतुक केले. सौमित्र यांच्या कवितांमध्ये जगण्यातील संघर्ष दिसून येतो. त्यांच्या अनेक कवितांनी मराठी रसिकांना भुरळ घातली आहे. पाऊस आणि कवी सौमित्र यांचे नाते त्यांच्या अनेक कवितांमधून घट्टपणे जाणवते, असे त्यांनी सांगितले.
​किशोर कदम यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्या कविता साध्या-सोप्या भाषेत सामान्य माणसांच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. हलसगीकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्या आजवरच्या काव्य प्रवासाला मिळालेली पावती आहे.

​अध्यक्षीय भाषणात डॉ. सुहासिनी शहा यांनी कवी सौमित्र यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला. मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात हलसगीकरांच्या साहित्यिक योगदानाचा आणि साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. तर कार्याध्यक्ष सायली जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले.

. यावेळी कल्याण शिंदे, डॉ. श्रुती वडगबाळकर, रामचंद्र धर्मशाळे, अविनाश कामतकर, अश्विनी वाघमोडे आणि संदीप कुलकर्णी यांचा कवी सौमित्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी वाघमोडे यांनी केले, तर यशवंत बिराजदार यांनी आभार मानले.या समारंभाला अशोक हलसगीकर, वसुधा हलसगीकर, प्रदीप हलसगीकर, रवी हलसगीकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर, मोहन दाते, डॉ. नसीम पठाण, डॉ. रवींद्र पाठक, डॉ. किरण पाठक, श्रीकांत कुलकर्णी, प्रशांत जोशी, अचला राचर्ला, डॉ. माधुरी भोसले, संतोष पवार, रोहिणी कुलकर्णी,सचिन चौधरी, गोविंद काळे, डॉ. शिवाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

. ​सासुरवाडीचा सन्मान
​कवी सौमित्र हे सोलापूरचे जावई आहेत, आपल्या भाषणात त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, दत्ता हलसगीकर यांच्या नावाचा पुरस्कार मला माझ्या सासुरवाडीत मिळतोय याचा मला विशेष आनंद झाला आहे. अकरा वर्षांपूर्वी प्रिसिजनने माझा गौरव केला होता, इथे माझ्या नात्यातील अनेक मित्र आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मी स्वीकारला आहे. यापूर्वी मला अनेक पुरस्कार मिळाले; परंतु सोलापूरच्या या पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे, अशा शब्दांत त्यांनी सोलापूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी काही कविता सादर केल्या.

Previous Post

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

Next Post

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026