• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घ्या, सकल मातंग समाजाचा राज्य सरकारला अल्टिमेटम

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2026
in Blog
0
आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घ्या, सकल मातंग समाजाचा राज्य सरकारला अल्टिमेटम
0
SHARES
4
VIEWS

पावसाळी अधिवेशनात उपवर्गीकरण जाहीर करा, अन्यथा आझाद मैदानावर मोर्चा

सोलापूर : अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. सोमवारी सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय निर्धार बैठक सोलापुरात पार पडली यावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे आरक्षणाच्या लाभापासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या ५७ जातींना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली असताना महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत राज्यभरातील नेत्यांकडून करण्यात आली आहे.

सकल मातंग समाजाने राज्य शासनाला आगामी पावसाळी अधिवेशनात उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर विभागीय मोर्चे, जिल्हास्तरीय आंदोलने तसेच मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आरक्षणाच्या लाभाचे जातनिहाय सर्वेक्षण, विविध योजनांचा लाभ कोणत्या समाजघटकांपर्यंत पोहोचला याचा अहवाल जाहीर करणे, तसेच सामाजिक न्यायाच्या दृष्टीने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर विधानपरिषद आमदार अमित गोरखे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,माजी आमदार सुधाकर भालेराव , लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजिंक्य चांदणे, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि राज्यभरातील मातंग समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.राज्य शासनाने समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next Post

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026