आज इंडियन रेडक्रॉस सोसायटी – सोलापूर जिल्हा शाखेला महाराष्ट्र राज्य शाखेकडून
२०२३–२४ मधील उल्लेखनीय रेडक्रॉस कार्याबद्दल अत्यंत मानाचा “डॉ. एन. सी. पुरी फिरता चषक” प्रदान करण्यात आला. 🏆
हा सन्मान इंडियन रेडक्रॉस सोसायटी, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात
सोलापूर जिल्हा शाखेच्यावतीने चेअरमन डॉ. राजीव प्रधान आणि सचिव जयेश पटेल यांनी स्वीकारला.
या कार्यक्रमास इंडियन रेडक्रॉस सोसायटी, महाराष्ट्र राज्य शाखेचे चेअरमन श्री. होमी खुसरोखन,
उपाध्यक्ष श्री. अदी दुभाष, खजिनदार श्री. मेहली गोळवाला आणि
मानद सचिव श्री. टी. बी. सक्लोथ यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार म्हणजे गोपाबाई दमानी रक्त संकलन केंद्र यांच्या सातत्यपूर्ण सेवा,
उत्कृष्ट व्यवस्थापन आणि समर्पित टीमच्या अथक प्रयत्नांचे खरे फलित असल्याचे
सचिव जयेश पटेल यांनी सांगितले.
त्यांनी पुढे नमूद केले की, “आमच्या सर्व स्वयंसेवक, डॉक्टर, स्टाफ, रक्तदाते आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच
सोलापूर रेडक्रॉसने राज्यात हा मानाचा टप्पा गाठला आहे.”

