सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत गुरुवारी नूतन मराठी विद्यालय प्रशालेत काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी रेखा सोळुंखे, तहसीलदार जयवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले. आता सभापती आरक्षणकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण पुढीलप्रमाणे
वडाळा-सर्वसाधारण
नान्नज-सर्वसाधारण
मार्डी-अनुसूचित जाती सर्वसाधारण
दारफळ बी बी-ओबीसी महिला
कोंडी- ओपन महिला
तिर्हे-ओपन महिला