सिद्धार्थ मल्होत्राने दिग्दर्शक करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.सिद्धार्थ मल्होत्रा अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत थँक गॉड या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याने इन्स्टाग्रामवर त्याचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.सिद्धार्थ मल्होत्रा सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान, मोहक, धडाकेबाज अभिनेत्यांपैकी एक आहे.

सिद्धार्थ हा एक स्टाईल आयकॉन आहे जो नेहमीच सोशल मीडियावर आपला नवीन लुक शेअर करतो.त्याने काळा आणि निळा शर्ट आणि त्याच रंगाची कॉम्बिनेशन पँट घातली आहे. अभिनेत्याने पांढरे बूट घालून त्याचा लूक पूर्ण केला.











