सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या एका प्रौढाचे अडीच तोळे वजनाचे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट चोरट्याने पळवून नेले. मंगळवारी सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकात ही घटना घडली. याप्रकरणी देवीदास रेऊ राठोड यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी मंगळवारी भाजपाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीत सहभाग घेतला होता. सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे ७५ हजार रुपयांचे सोन्याचे लॉकेट चोरून पोबारा केला. याप्रकरणी गुन्हा नोंदला असून, तपास हवालदार चुंगे करीत आहेत.