येस न्युज मराठी : दाधिच (दायमा) समाज, सोलापूरच्या वतीने दि. २० से २६ डिसेंबर रोजी माहेश्वरी सांस्कृतिक भवन, तुळजापूर वेस, सोलापूर येथे श्रीमद् भागवत कथाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परम पुज्य आचार्य पवनकुमारजी मालोदिया (दाधिच), वरंगल निवासी यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा चे आयोजन करण्यात आले आहे.
चर्चा, श्री भागवत महात्म्य भक्ति ज्ञान वैराग्य ची स्थापना, गोकर्ण उपख्यान, कथा, सूत शोनक संवाद, नारद जी चे पूर्व चरित्र, भीष्म स्तुति, परिक्षितांचे जन्म शुक परीक्षित भेट. कपिल उपख्यान, सती चरित्र, ध्रुव चरित्र, जह भरत चरित्र, अजमिलोपाख्यान, श्रीनृसिंह अवतार, जेंद्रमोक्ष, समुद्र मंथन, वामन अवतार ची कथा, श्री राम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, नंदोत्सव, पूतनासाख, बाललीलाएं, गोवर्धन लीला महाराज, कंसाचे उध्दार, कृष्णा उध्दार, गोवर्धन लीला महाराज. विवाह, द्वारिका तीला, सुदामा चरित्र परीक्षित मोक्ष, श्रीमद्भागवत कथा समाप्ती असे कार्यक्रम होणार आहे.
तरी समस्त भागवत प्रेर्मीना याचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजाचे अध्यक्ष भरत काकडा यांनी केले आहे.

