• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजनच्या सामाजिक कार्याचा गौरव — दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2025
in इतर घडामोडी
0
प्रिसिजनच्या सामाजिक कार्याचा गौरव — दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान
0
SHARES
0
VIEWS

मुंबई — प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीचा आज पुन्हा एकदा गौरव झाला. मुंबईतील मोतीलाल ओसवाल टॉवर येथे पार पडलेल्या “रोटरी नॅशनल सीएसआर अवॉर्ड” सोहळ्यात प्रिसिजनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात आलेल्या दोन प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले.

प्रिसिजनने ज्ञानप्रबोधिनीच्या एका अनोख्या प्रकल्पाला आपला सीएसआर निधी उपलब्ध करून दिला. ज्ञान प्रबोधिनीने “मुक्ती प्रकल्पा”च्या माध्यमातून बिडी कामगार महिलांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिला, तंबाखूच्या दुष्परिणामांपासून त्यांचे आरोग्य आणि जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाईचे काम उपलब्ध करून दिले. आजवर ६० हून अधिक महिला बिडी वळण्याच्या कामापासून मुक्त होऊन नवा आरोग्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण व्यवसाय करत आहेत. या उपक्रमाला प्रिसिजनच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून मोलाचा हातभार आहे.

दुसरा पुरस्कार कम्युनिटी ॲण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या क्षेत्रासाठी केलेल्या एकंदर योगदानाबद्दल देण्यात आला. या भव्य दिव्य अशा पुरस्कार प्रदान सोहळ्यात सुप्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ मोतीलाल ओसवाल, अभिनेते आणि समाजसेवक सोनू सूद, तसेच रोटरीचे मनिष मोटवानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रिसिजन कंपनीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन मा. यतिन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या सामाजिक जाणिवेतून, दूरदृष्टीतून आणि तळमळीतून हे उपक्रम साकार झाले आहेत. शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास आणि सामाजिक संस्थांच्या बळकटीकरणासाठी प्रिसिजन नेहमीच कटिबद्ध राहिली आहे. सामाजिक उत्तरदायित्व ही संकल्पना कॉर्पोरेट क्षेत्रात २०१३ पासून आलेली असली तरी प्रिसिजनने मात्र २००६ पासूनच आपल्या प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला होता. सोलापूर जिल्हयातील अनेक सामाजिक आणि आर्थिक बळकटीकरणाचे प्रकल्प प्रिसिजनच्या माध्यमातून उभे आहेत.

कंपनीच्यावतीने हे पुरस्कार स्वीकारताना “सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा अभिमान” व्यक्त करण्यात आला.

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 28 वाहनासह 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Next Post

रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे साईबाबा शाळेत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे साईबाबा शाळेत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे साईबाबा शाळेत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026