पुणे: शालेय फी च्या मुद्यावर पुण्यातील पालक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरोना कालावधीत मागील शैक्षणिक वर्षीची फी कमी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय व राज्य शासन यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
याचिकेचे मुख्य वकील ॲड.मयंक क्षीरसागर असून त्यांना ॲड.पंखुडी गुप्ता व ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा हे सहाय्य करणार आहेत.कोरोना काळातील फीच्या मुद्यावर 15 पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार या वर्षी पालकांना दिलासा देण्यासाठी आदेश आणण्याची बतावणी करत असले तरी मागील वर्षाचे शुल्कवाढीबाबत त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.शालेय शिक्षणाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थींना शाळेत बसू न देणार्या राज्यातील 32 शाळांना नोटीस शिक्षण विभागानं दिली आहे. मुंबई, नवी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, नागपूर विभागातील शाळांना नोटीस दिली आहे. यात मुंबई, नवी मुंबईतील 10, पुणे येथील 10 , नाशिकमधील 5 , नागपूरमधील 5 आणि औरंगाबादमधील 2 शाळांना नोटीस देण्यात आली आहे.










