सोलापूर – येथील लायन्स क्लब ऑफ सोलापूर परिवाराच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा सप्ताहा निमित्त सोलापुरातील प्रख्यात रोलर स्केटिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू
मितेश दत्तात्रय काळेंचा लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष अमिता कारंडे व माजी अध्यक्षा पद्मजाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस पुढील आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मागील आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पदके मिळवल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. साऊथ एशीया स्केटिंग स्पर्धा व एशिया स्केटिंग स्पर्धेतील सुवर्ण पदक व रौप्यपदक मिळाल्याच्या आठवणींना मितेशने आपल्या मनोगतातून उजाळा दिला. यावेळी महेश कारंडे व लिओ अनुष्का हजर होते.