• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांचे आज वृद्धापकाळाने पुण्यात निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांचे आज वृद्धापकाळाने पुण्यात निधन
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : श्रीकांत मोघे यांचा अल्पपरिचय.जन्म. ६ नोव्हेंबर १९२९ किर्लोस्करवाडी येथे. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, पु ल देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये ‘दिल देके देखो’या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.
श्रीकांत मोघे हे नाटय़, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता या बरोबरच ते चित्रकार व वास्तुविशारद होते, उत्तम सुगम संगीत गायकही होते. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते. श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बी.एस्‌‍सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले. श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत. ’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला. श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती. पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.
पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. पुढे श्रीकांत मोघे यांनी १९५६ मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली. १९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित सेंटेनरी ड्रामा फेस्टिव्हलमध्ये ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील नायक म्हणून काम करणाऱ्या श्रीकांत मोघें यांच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला. त्याच वर्षी श्रीकांत मोघे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून लागले. त्या सुमारास पु.ल. देशपांडे दिल्लीत होते. त्यांना एका गायक नटाची गरज होती. पुलंनी श्रीकांत मोघे यांनी ’कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकातली एक भूमिका दिली. घराबाहेर, लग्नाची बेडी, अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, आंधळ्यांची शाळा, वा-यावरची वरात, लेकुरे उदंड जाहली, सीमेवरून परत जा, आदी नाटकांतून ठसा उमटवणा-या मोघे यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ‘पुलकीत आनंदयात्री’ हा त्यांचा एकपात्री प्रयोगही जगात अनेक ठिकाणी सादर झाला आहे. रंगभूमीच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ वावरलेल्या श्रीकांत मोघे यांना नाटकाने नाव, पैसा आणि प्रसिद्धी दिली. ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे हे त्यांचे बंधू होत. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत व अभिनेत्री प्रिया मराठे या सुनबाई होत. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन ६ फेब्रुवारी २०१५ रोजी बेळगाव येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात झाले होते.
नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
साभार – संजीव वेलणकर पुणे

Previous Post

सोलापुरातील व्यावसायिक दिपक जक्कल यांचे निधन

Next Post

१०० महिने जरी लागले तरी देखील मी शेतकऱ्यांसोबत उभी – प्रियंका गांधी

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
सिटीझन रिपोर्टर

रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी

February 9, 2022
Next Post
१०० महिने जरी लागले तरी देखील मी शेतकऱ्यांसोबत उभी – प्रियंका गांधी

१०० महिने जरी लागले तरी देखील मी शेतकऱ्यांसोबत उभी - प्रियंका गांधी

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026