येस न्युज मराठी नेटवर्क : गुरुवारी दिल्ली येथे खासदार शरद पवार यांची आमदार यशवंत माने यांनी भेट घेऊन मोहोळ मतदारसंघातील विविध विकासकामा संदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच महाराष्ट्र शासनाने कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठविण्या संदर्भातचा प्रस्ताव अधिवेशनात ठराव मंजूर करून केंद्र सरकार कडे सादर केला आहे. त्यासंदर्भात सहकार्य करण्याची विनंती देखील शरद पवार यांच्या कडे आमदार माने यांनी केली.