सोलापूर – मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील रहिवासी व नेमबाज अजिंक्य महेंद्र चव्हाण याने पेरुची राजधानी लिमा येथे सुरु असलेल्या जागतिक ज्युनियर स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ५० मीटर फ्री पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकाविले आहे. अजिंक्य हा सध्या पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सेवेत आहे.