आरोपीला ताब्यात द्या, त्याचा मुडदा पाडू महिलांचा संतापजनक आक्रोश
मालेगाव येथील डोंगराळे गावातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिचा खून करणाऱ्या विजय संजय खैरनार या नराधम आरोपीस कोर्टाने 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या घटनेचा संपूर्ण राज्यात तीव्र निषेध आणि संताप व्यक्त केला जात असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी जोर धरीत आहे.दरम्यान मालेगाववासियांनी उद्या एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.सदरचे प्रकरण जलद न्यायालयात चालवू असे आश्वासन शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले आहे. यासंदर्भात अटकेत असलेल्या आरोपीस आज कोर्टात आणले असता महिलांनी लक्षणीय गर्दी केली होती.आरोपीस ताब्यात द्या; त्याचा मुद्दा पाडू , असे संतापजनक आक्रोश महिला करत होत्या.न्यायालयाने 27 तारखेपर्यंत आरोपीचा ताबा पोलिसांकडे दिला असून या घटनेचा संपूर्ण थरार जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

