• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमान्य टिळक यांचे सोलापूरशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2021
in इतर घडामोडी
0
लोकमान्य टिळक यांचे सोलापूरशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते
0
SHARES
3
VIEWS

लोकमान्य टिळक यांनी स्व राज्य , स्वदेशी , बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतु सूत्री धोरणे लोकांपर्यंत पोहचवून ब्रिटिशांच्या विरोधात कमालीचा असंतोष निर्माण केला टिळकां नी आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा कसोशीने उपयोग करून घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात शून्यातून चळवळ उभी केली मराठी वृत्तपत्रसृष्टीती ल क्रांतीकारी कालखंडाचा प्रारंभ टिळकांनी केसरीच्या सडेतोड अग्रलेखांमधून करून दिला. 1 ऑगस्ट रोजी त्यांची स्मृतिशताब्दी त्यांना सोलापूरकरांतर्फे विनम्र अभिवादन .

1875 पासून लोकमान्यांचा सोलापूरशी सातत्याने संपर्क होता. टिळकांना सोलापूरचे हवामान मानवत असे. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर सोलापूरचा दौरा ठरलेला होता. परुंतु मुबई येथे न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना जावे लागले . 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे मुंबई येथील सरदार गृह येथे निधन झाले। लोकमान्य टिळक यांचे सोलापूरशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते होते सोलापुरातील वकील , डॉक्टर , व्यापारी , शेतकरी व सर्वसामान्य जनतेने त्यांचा स्वराज्याचा मंत्र शिरोधार्य मानून त्यांच्या प्रत्येक चळवळीला भक्कम साथ दिली होती इंद्रभुवनचे शिल्पकार कै अप्पासाहेब वा रद हे लोकमान्य यांचे घनिष्ठ मित्र होते कै बंडप्पा अण्णा का डा दी , शेठ गुलाबचन्द हिराचंद , रावसाहेब निंबर्गीकर शहा , शिवलाल गांधी , माणिकचन्द विरचंद , कै मल्लिकार्जुन अप्पा पाटील , कै महालिंगप्पा वजीरकर, देशभक्त ज मो सावंन्त, रामभाऊ राजवाडे , भाऊसाहेब खडकीकर , श्रीनिवास काड गावकर डॉ गोगटे , डॉ जेउरकर आदी लोकमान्य यांचे चाहते व अनुयायी होते. लोकमान्य यांचे पालिका दवाखान्यासमोरील पटांगणात 28 फेब्रुवारी 1908 रोजी व्यख्यान झाले या व्यख्यानात त्यांनी संस्था स्थापून उदयोग सुरु करण्याचा संदेश दिला. बार्शी येथे 4 मार्च 1908 रोजी स्वदेशी चळवळ या विषया वर रा. ब . वैद्य यांच्या उपस्तिथीत व्याख्यान झाले. सोलापुरातील दक्षिण बझार येथे देशभक्त कै बंकटलाल सोनी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही दरिद्री का? या विषयावर व्याख्यान झाले. नागरिकांनी केलेल्या सत्कारामुळे लोकमान्य यावेळी भारावून गेले होते. लोकमान्यांवर 1897 मध्ये पहिला राजद्रोहाचा खटला ब्रिटिशांनी भरल्यानंतर कै अप्पासाहेब वा र द यांनी सोलापुरातील श्रीमंत मल्लिकार्जू नप्पा पसरे याचे मेहुणे व पुण्यातील मीठगंज येथील सधन व्यापारी उरवणे शेठ यांचा जमीन मिळवून दिला होता. टिळकांनी 1918 मध्ये सोलापूरला भेट दिल्यानंतर नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत करून मिरवणूक काढली होती. त्यानंतर रेल्वे लाईन्स भागातील बुबणे बंगल्यात कर्मयोगी कै अप्पासाहेब का डा दी यांचे वडील कै बं डप्पा काडादी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत नागरिकांनी जमवलेला टिळक फंड लोकमान्य यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. कै अप्पासाहेब वारद यांचे 1911 मध्ये निधन झाले. त्यावेळी लोकमान्य मंडाले तुरुंगात होते वा र द यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यादिवशी लोकमान्य यांनी अन्न ग्रहण केले नाही. त्यांनी तुरुंगातुनच वा र द कुटुंबियांना सांत्वन पर पत्र पाठवले. या पत्राची सुरुवात पुण्यश्लोक अप्पासाहेब वा र द अशी केल्यामुळे अप्पासाहेबांच्या नावा अगोदर पुण्यश्लोक असे लिहिले जाते. 1920 च्या प्रांतिक परिषदेंनन्तर लोकमान्य टिळक यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सध्याच्या टिळक चौकात विसर्जित झाली. तेंव्हां पासून या चौकाला टिळक चौक असे नाव पडले. स्वदेशी कापड निर्मितीसाठी सोलापुरात 2 कापड गिरण्या उभारण्यासाठी टिळक यांनी मार्गदर्शन केले होते. कै अप्पासाहेब वा र द यांनी हैद्राबादचे राजा ग्यानिगिरजी यांच्या भागीदारीत एन जी मिल सुरु केली तर कै बं डप्पा अण्णा का डा दी यांनी लालजी नारायणजी यांच्या भागीदारीत जाम मिल सुरु केली होती. सोलापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचे महत्वपूर्ण काम टिळक यांनी केले होते. हे सोलापूरकर विसरणार नाहीत. टिळक व सोलापूर यांचे आपुलकीचे नाते असल्यामुळे कै बाबुराव अण्णा चाकोते महापौर असताना शरद पवार व विधान परिषदेचे माजी सभापती कै जयंतराव टिळक यांच्या उपस्थितीत टिळक चौकात लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापुरात उभारण्यात आला.

Lokmanya Tilak's close and intimate relationship with Solapur
Previous Post

गुगल वाचून तज्ञ होणारे सामान्य लोक त्रासदायक : डॉ. शर्मा

Next Post

पूरग्रस्त दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे 26 मागण्या

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
पूरग्रस्त दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे  26 मागण्या

पूरग्रस्त दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे 26 मागण्या

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026