• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रूपाभवानी मंदिरात गुरुवारी घटस्थापना

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2024
in इतर घडामोडी
0
रूपाभवानी मंदिरात गुरुवारी घटस्थापना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे दि. ३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.रूपाभवानी मंदिरात गुरुवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. दररोज नित्तोपचार पूजा व छबिना असे धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाली आहे. गुरुवार दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी १२.१५ वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असून दररोज देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना निघणार आहे. ७ रोजी ललिता पंचमी असून सायंकाळी ५ वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे.

दि. ११ रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून . रात्री ७ वाजता मसरे यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघणार आहे. रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे. दि. १२ रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी ५ वाजता श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत-गाजत प्रस्थान होणार आहे. पालखीतून श्री रुपाभवानी माता सीमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे प्रस्थान होईल.

दि. १६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री देवीची महापूजा व दूधप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दि. १७ रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा व रात्री छबिना काढण्यात येणार असून नवरात्रौत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले, सुधीर थोबडे राजशेखर हिरेहब्बु, बाळासाहेब मुस्तारे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, मल्लिनाथ खुणे, बिपीन धुम्मा, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.

दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगेची व्यवस्था

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप असलेल्या श्री रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात हजारो महिला भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुषांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य शिबिरही ठेवण्यात आले आहे. दर्शनासाठी येताना महिलांनी आपली दाग-दागिने सांभाळावेत, लहान मुलांना गर्दीत सोडू नये, असे आवाहन ट्रस्टी मल्लिनाथ मसरे यांनी केले आहे.

Previous Post

खंडणीसाठी सोलापुरातील पिता-पुत्राचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Next Post

सोलापूर विमानतळाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
सोलापूर विमानतळाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर विमानतळाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026