• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी, एकटाच फिरतो, लढतो; संजय राऊतांचा टोला

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2023
in मुख्य बातमी
0
मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी, एकटाच फिरतो, लढतो; संजय राऊतांचा टोला
0
SHARES
0
VIEWS

संजय राऊत एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

आपल्यावर हल्ला होऊ शकतो, हे आपण गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे, सुरक्षा मागितलेली नाही. मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी आहे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली आहे. मी सुरक्षा मागितली नाही, तरी मी एकटाच फिरतो आणि एकटाच नडतोय, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या विरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

संजय राऊत  यांचे नाशिकमध्ये असून त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपल्यावर हल्ल्याची भीती वाटते. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याची सुपारी दिली गेली आहे. फडणवीस गृहमंत्री असताना हे घडत असून राज्यात रोजच खून, दरोडे, बलात्कार होत आहेत. लोकप्रतिनिधी ही सुरक्षित नाहीत.” संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “मला सुरक्षेची गरज नाही, उलट त्यांना सुरक्षा लागली, तर मी देईल. मी एकटाच फिरतो, लढतो. गृहमंत्री पद हे जनतेला सुरक्षित करण्यासाठी हवे. फुटीर आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यासाठी नव्हे.”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार टीका करताना ते म्हणाले की, “आपण गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कळवले. सुरक्षा मागितलेली नाही. मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी आहे, रामभाऊ माळगी प्रबोधिनीचा नाही, फडणवीस यांना मी सुसंस्कृत समजत होतो, आता नाही.”, अशी टीका राऊतांनी केली. मला सनसनाटी आरोप निर्माण करायची गरज नाही. उलट फडणवीस हे अत्यंत बेफिकीरपणे वागत आहेत. ते इतरांचं बुद्धीचे माप काढतात, मी त्यांच्या बुद्धीचे माप काढायला लागलो, तर गडबड होईल, असे राऊत म्हणाले.  संजय राऊत हे नाशिकमध्ये आले असून आज ते सिन्नर तालुक्यातील एका उदघाटन सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांनी गृहमंत्री आणि ठाणे पोलिसांना दिलेल्या पत्रांनंतर खळबळ उडाली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र ठाणे पोलिसांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिले होते. त्यामुळे संजय राऊत आज नाशिकमध्ये असताना त्यांच्या सुरक्षेसाठी 3 पोलीस कर्मचारी आणि एक वाहन तैनात ठेवण्यात आले आहे. शिवाय ठाण्याचे पोलीस पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून संजय राऊत यांचा पत्राप्रकरणी जबाब घेतला जात आहे. 

Previous Post

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मध्ये तीन महिलांची अज्ञात व्यक्तीने केली हत्या

Next Post

नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार

नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार

ताज्या बातम्या

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026