• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 28, 2021
in मुख्य बातमी
0
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस- आरोग्यमंत्री राजेश टोपे
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि.२८: राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असून हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. मात्र लसींच्या उपलब्धतेबाबत आव्हानात्मक परिस्थिती असल्याने इच्छा असुनही १ मे पासून लसीकरणास प्रारंभ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

मंत्रालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. त्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे असे:

· १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी डोसेस आवश्यक असून त्यासाठी ६५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

· लसीकरणाचा हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागणार असून दर महिन्याला दोन कोटी लस देण्याची राज्याची क्षमता आहे.

· सध्या लसींची उपलब्धता नसल्याने दि. १ मे पासून १८ ते ४४ वयोगाटीतल लसीकरणाला प्रारंभ होणार नाही. कोविन ॲपवर नोंदणी, तारीख आणि वेळ निश्चिती करूनच लस घेता येईल. थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. ही केंद्र कोरोना पसरविणारे ठरू नयेत यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन श्री. टोपे यांनी युवा वर्गाला केले आहे.

· सध्या जेथे लसीकरण सुरू आहे त्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील.

· राज्यात आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून प्रत्येकी दिवसाला १०० डोस दिले तरी एका दिवसात १३ लाख लोकांचे लसीकरण होऊ शकते.

· सध्या लस वाया न जाऊ देण्याचे राज्याचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. राष्ट्रीय सरासरीच्या खुपच कमी असून योग्य प्रमाणात लस वापरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचे श्रेय जाते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

· राज्यात सध्या कोवॅक्सिन लस उपलब्धतेची टंचाई जाणवत असून ही लस बनविणाऱ्या कंपनीने सध्या १० लाख लस देण्याचे मान्य करतानाच जुलै, ऑगस्टमध्ये दरमहा २० लाख लस देऊ शकतो असे पत्र दिले आहे.

· कोविशिल्ड लस प्रति महिना १ कोटी डोस मिळू शकतातअसे त्या कंपनीने तोंडी कळविले असून दोन्ही लसींच्या उपलब्धतेनुसार प्रमाण ठरवून त्या दिल्या जातील.

· रशीयन लस स्पुटनिक बाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येत आहे. ही लस योग्य दरात आणि प्रमाणात मिळाली तर त्याचाही आंतर्भाव केला जाईल. ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान झायडस कॅडीला आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या दोन कंपन्यांच्या लसीचा पुरवठा होऊ शकतो, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

· ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर शहरात २३२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा

Next Post

पंकजा मुंडेंना करोनाची लागण

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
पंकजा मुंडेंना करोनाची लागण

पंकजा मुंडेंना करोनाची लागण

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026