• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2024
in इतर घडामोडी
0
निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
1
VIEWS

सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

•जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहिता बाबत आढावा बैठक संपन्न

सोलापूर, दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 7 मे रोजी मतदान पार पडणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निर्भय , निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, अजित बोराडे, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, अधिक्षक अभियंता सा.बां. विभागाचे संजय माळी, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा परिषद च्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा कोषागार अधिकारी मोमीन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख दादासाहेब घोडके यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही विभाग प्रमुखांनी नवीन काम सुरू करू नये, नवीन कामाचे कार्यारंभ आदेश वितरित करू नये, जे काम सुरू आहे ते काम पूर्ण करून घ्यावे. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील सर्व कामांची व कामांची सद्यस्थितीची माहिती तात्काळ प्रशासनाला सादर करावी. अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्ष्यांच्या नेते तसेच मंत्री महोदय यांच्या बैठकीस उपस्थित राहू नये. तसेच त्यांची खाजगीत भेट घेऊ नये, असे आढळून आल्यास संबंधिताविरोध कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सुचित केले. आदर्श आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत.

या निर्देशांप्रमाणे सर्व शासकीय विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून 24 तास, 48 तास आणि 72 तासांमध्ये आवश्यक कार्यवाहीची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाकडे पाठवावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक विषयक कामकाज हे प्राधान्याने आणि अचूकपणे होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच या काळात सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी समन्वयाने आणि काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. आचारसंहिता कालावधी टंचाईच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना राबविण्याबाबत कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाकडे दैनंदिन पाठवण्यात येणाऱ्या विविध अहवालाची माहिती त्यांनी दिली. तसेच शासकीय वाहनाचा निवडणूक कामात वापर होणार नाही याबाबत सर्व संबंधित विभागाने काळजी घ्यावी.
सोलापूर शहर नगरपालिका व ग्रामीण भागातील विविध शासकीय मैदाने राजकीय पक्षांना प्रचारासाठी वापरण्यास देण्याबाबत संबंधित विभागाने तात्काळ यादी एक खिडकी योजना राबवणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहे राजकीय वापरासाठी उपलब्ध करून देऊ नये, अशी माहिती त्यांनी दिली.

Tags: CollectorGovernment agencies should coordinate to conduct elections successfully in a fearlessKumar Ashirwad
Previous Post

लक्ष्मी ऑटोमोबाईल येथे हिरो च्या नवीन एक्सट्रीम 125 आर या गाडीचे करण्यात आल लॉन्चिंग …

Next Post

पंढरपूरच्या विठ्ठलास बुलेटप्रूफ काचेचे आवरण

Related Posts

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी
इतर घडामोडी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026
ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक
इतर घडामोडी

ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

October 26, 2026
ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!
इतर घडामोडी

ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

October 26, 2026
हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
Next Post
पंढरपूरच्या विठ्ठलास बुलेटप्रूफ काचेचे आवरण

पंढरपूरच्या विठ्ठलास बुलेटप्रूफ काचेचे आवरण

ताज्या बातम्या

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026