सोलापूर : विजापूर रस्त्यावरील स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी तात्या जाधव यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून बोलत असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने पाच लाख रुपयांना फसविले आहे . तात्या जाधव यांनी संबंधित व्यक्तीस बँक खात्याची कोणतीही माहिती दिली नव्हती. परंतु फिर्यादीचा खाते क्रमांक व पासवर्ड हॅक करून ऑनलाइनद्वारे ही पाच लाखाची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया चंदिगड सेंटर बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीचा मोबाईल नंबर 83 48 66 0 245 असा आहे.