केळी पिकावर पडणाऱ्या मर किंवा पनामा रोगापासून शेतकऱ्यांना आता कायमचे मुक्ती मिळणार असून जनुकीय सुधारणा करून मर रोगमुक्त केळीचे क्यू सी ए व्ही फोर हे नवे वाण ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. व्यावसायिक उत्पादनासाठी मंजूर झालेली ती जगातील पहिली जीएम केळी आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अन्नसुरक्षा नियमकांनी या केळीचे सखोल मूल्यांकन केले असून त्यांच्या निष्कर्षानुसार ही जीएम केळी सामान्य केळी एवढीच मानवी वापरासाठी सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील केळी उत्पादकांना धोका कमी असून कमाई जास्त होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

