• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्ये सोलापूरच्या उद्योजकांनी उतरावेत : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2024
in इतर घडामोडी
0
आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्ये सोलापूरच्या उद्योजकांनी उतरावेत : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
0
SHARES
0
VIEWS

आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचे बेंगळूरु येथे थाटात शुभारंभ

सोलापूर : सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये एकी आहे. याच एकीच्या बळावर देशातील बाजारपेठांसोबत आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्येही सोलापूरच्या उद्योजकांनी उतरावेत. त्यांची ती क्षमता आहे. गुणवत्ता, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या आधारावर निश्चितच आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्ये सोलापूरकर छाप पाडतील असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचे बेंगलुरु येथे बुधवारी थाटात उद्घाटन झाले. बेंगळुरू येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तीन दिवसीय फेअरचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, रिलायन्स कंपनीच्या कंज्यूमर विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष शरद कुमार, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी, सचिव व्यंकटेश मेंगजी आदी उपस्थित होते. असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश पवार यांनी आभार मानले. या फेअर मध्ये 104 गारमेंट कंपन्यांचे स्टॉल असून यात 120 युनिफॉर्म ब्रँड तसेच बारा हजाराहून अधिक डिझाइन्सचा समावेश आहे.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, त्रिपुरा येथील गारमेंट उद्योजकांनी मार्केटिंग कौशल्याच्या आधारे डोमेस्टिक मार्केटसोबत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपली एक वेगळी छाप पाडली. त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील गारमेंट उद्योजकही तशी प्रगती करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात सोलापूरच्या गारमेंट उत्पादनाबद्दल आवर्जून उल्लेख करतात. हे येथील उद्योजकांचे यश आहे. सोलापुरात तयार होणारे युनिफॉर्म हे युनिव्हर्सल आहे. त्यामुळे युनिफॉर्म क्षेत्रातील त्यांची क्षमता त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर सादर करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात त्यांना संरक्षण विभागातील विविध युनिफॉर्मचे ऑर्डर्स मिळू शकतात.
गारमेंट उद्योगात सक्रिय उद्योजकांनी उलाढालीची चिंता न करता त्यांनी मार्केटिंग कौशल्य शिकून निर्यात करण्याचे धाडस केले पाहिजे.

सुभाष देशमुख म्हणाले,
2016 साली गारमेंट उद्योजकांनी माझी भेट घेतली होती. उद्योग अडचणीत असल्याची माहिती दिली. गारमेंट उद्योगातील कामगारही स्थलांतरित होत आहेत. कामगारांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांच्याकडून झाली. यातूनच गारमेंट फेअरची संकल्पना पुढे आली. मागील आठ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअर उत्साहात आयोजिला जात आहे. यास देशासह विदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोलापूरच्या विडी उद्योगात पूर्वी ९० हजाराहून अधिक महिला काम करायच्या. धूम्रपान विरोधी कायद्यामुळे विडी उद्योगावर गंडांतर आले. त्यामुळे विडी महिला कामगारांची संख्या कमी झाली. अनेक महिला बेरोजगार झाल्या. सोलापुरातील गारमेंट उद्योगाने विडी महिला कामगारांना आधार दिला. आज गारमेंट उद्योगात असंख्य महिला काम करत आहेत.

Previous Post

लोकमंगल प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

Next Post

तहसिलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणुकतिघांविरूध्द गुन्हा दाखल

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
तहसिलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणुकतिघांविरूध्द गुन्हा दाखल

तहसिलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणुकतिघांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026