येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलाय. मात्र कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार हा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन,संचारबंदी लागू करण्यात आली आहे,तर आणखी काही जिल्हे 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात 15 मे नंतरही कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. सोलापूरसह ज्या जिल्ह्यात 15 मे रोजी लॉकडाऊनची मुदत संपत आहे, अशा जिल्ह्यातही पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
सरकारला यंत्रणा मजबूत करण्यासाठी वेळ लागणार आहे. ऑक्सिजनची उपलब्धता तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 15 मे नंतर सर्व व्यवहार सुरू केले तर कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आहे तशीच कायम ठेवत जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.











