सोलापूर शहर हद्दवाढ भागातील मिळकतींचा होणार सिटी सर्वे
सोलापूर : बर्याच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना आता सिटीसर्वे चे उतारे मिळतील कारण सोलापूर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हद्दपार भागाचा सिटीसर्वे करण्यासाठी 9 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. महापालिकेतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे महापालिका नऊ कोटी रुपये शासनाच्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे भरेल त्यानंतर सिटीसर्वे चे काम सुरू होईल व नागरिकांना मिळकतीचे सिटीसर्वे उतारे तसेच प्रॉपर्टी कार्ड देखील मिळतील अशी मते अनेक नगरसेवकांनी उपस्थित केली याबाबत नगरसेवक बाबा मिस्त्री आनंद चंदनशिवे गुरु शांत दुत्तर गावकर अमोल शिंदे चेतन नरोटे तोफिक हत्तुरे श्रीनिवास करली आदींनी भाष्य केले










