सोलापूर- सोलापूर शहरातील गुंठेवारी व मंजूर रेखांकन अन्वये विकास झालेला आहे परंतु अंतिम मंजुरी घेण्यात आलेली नाही. या संदर्भात आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, गटनेते आनंद चंदनशिवे,गटनेते चेतन नरोटे, गटनेते रियाज खरेदी,नगरसेवक संजय कोळी,नगरसेवक प्रभाकर जामगुंडे,नगरसेवक नागेश वल्याळ,नगरसेवक नागेश भोगडे,सहाय्यक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत महापालिका आयुक्त यांनी गुंठेवारी नियमितपणे करून घेण्यासाठी साठी दोन महिने मुदत दिली होती. पण आज समितीने गुंठेवारी नियमितपणे करून घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यासाठी आदेश देण्यात आले.अंतिम लेआऊटसाठी ज्या लोकांना महापालिकेचे नोटीस देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दंड आकारून नियमित करून देण्यात येईल.सोलापूर शहरातील गुंठेवारी व मंजूर रेखांकन अन्वये विकास झालेला आहे. परंतु अंतिम मंजुरी घेण्यात आलेली नाही. परंतु त्यांची भूखंडनिहाय मोजणी झालेली नाही व ज्या ठिकाणी गुंठेवारी अन्वये विकास झालेला आहे. त्याचे नगर भूमापन झालेले नाही अशा ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेकडून भूखंड निहायमोजणी करून याकामी येणारा खर्च महानगरपालिका करण्यात येणार आहे.तसेच गुंठेवारी क्षेत्रातील लोकांना शासनाच्या नियमानुसार दर आकारण्यात येणार आहे. प्रॉपर्टी कार्ड दिल्यानंतर नागरिकांना कडून वसूल करण्यात येईल.असा निर्णय समिती मार्फत घेण्यात आले.










