• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर शिवसेनेकडून आदर्श शिवसैनिक पुरस्कारांचे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर शिवसेनेकडून आदर्श शिवसैनिक पुरस्कारांचे वितरण
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) : शहर शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आदर्श शिवसैनिक पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्तम कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शिवसैनिकांना यावेळी गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख आणि संयोजक गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, शंकर चौगुले, संतोष पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, भक्ती जाधव, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, राजकुमार हंचाटे, निरंजन बोद्धूल आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हासंघटक लहू गायकवाड, शहरसंघटक तुषार अवताडे, रिक्षा सेनेचे शहरसंघटक बबलू खरात, रिक्षासेनेचे जिल्हा संघटक सुरेश जगताप, शिवसेना प्रभाग क्रमांक तीनचे विभागप्रमुख शिवा ढोकळे, माजी परिवहन सभापती व जय महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम मस्के, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांना गौरविण्यात आले.

स्मृतिचिन्ह, फेटा देऊन जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर चौगुले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘निष्ठावान शिवसैनिक हीच शिवसेनेची संपत्ती आहे. निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरच आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा मनपावर फडकेल’, असा आशावाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख बरडे म्हणाले, शिवसैनिकांचा सन्मान होणे आवश्यक आहे. शिवसैनिकांनी निस्वार्थपणे केलेल्या कार्यामुळेच शिवसेना आज घराघरात पोहचली आहे. आजवर शिवसेनेवर अनेक संकटे आली. परंतु शिवसेना खंबीरपणे उभी राहिली. त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आपल्या सोबत कोण आहे अथवा नाही याचा विचार न करता शिवसैनिकांनी महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी कार्यरत रहावे. जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, शिवसैनिकांनी आजवर अनेक आंदोलने केली, समाजोपयोगी कामे केली. अशांचा सन्मान होणे कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागातही असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शहर प्रमुख आणि संयोजक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांची ऊर्जा आहे. त्यांची जयंती शिवसैनिकांनी अत्यंत उत्साहात आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने केली. अशा शिवसैनिकांचा सन्मान व्हावा या हेतूने हे पुरस्कार देण्यात आले आहेत. शिवसैनिकांमध्ये चांगले कार्य करण्यासाठी निकोप स्पर्धा असावी. भविष्यात असे सन्मान स्वीकारणाऱ्या सैनिकांची संख्या दसपटीने वाढावी अशी अपेक्षा ही धुत्तरगांवकर यांनी व्यक्त केली. उपजिल्हाप्रमुख अमर पाटील म्हणाले, अशा पुरस्कारातून आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा निश्चित मिळते.

विनायक दुदगी यांनी सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख आणि संयोजक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रास्ताविक तर प्रसिद्धीप्रमुख निरंजन बोद्धूल यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमास संताजी भोळे, बाळासाहेब माने, जयंत कदम, शशिकांत बिराजदार, सोमनाथ शिंदे, सचिन गंधुरे, रोहित तडवळकर, प्रभाकर गंपले, आनंद मुसळे, जयराम सुंचू, सिध्दाराम खजुरगी, नरेंद्र क्षीरसागर, देविदास कोळी, केदार बरगाले, धानप्पा निंबाळ, उमेश जेटगी, गजानन केंगनाळकर, बसवराज जमखंडी, रितेश मार्गम, पृथ्वी खैरमोडे आदी उपस्थित होते.

Previous Post

कै. यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन

Next Post

देशस्थ ऋग्वेदी  ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे 72 हजार रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
देशस्थ ऋग्वेदी  ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे 72 हजार रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

देशस्थ ऋग्वेदी  ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे 72 हजार रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

ताज्या बातम्या

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026