• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कर्ज थकले: पंधे 341 कोटी, गोकुळ शुगर 28 कोटी यासह दोन माजी मंत्र्यांच्या प्रॉपर्टीचे लिलाव

by Yes News Marathi
October 26, 2025
in इतर घडामोडी
0
कर्ज थकले: पंधे 341 कोटी, गोकुळ शुगर 28 कोटी यासह दोन माजी मंत्र्यांच्या प्रॉपर्टीचे लिलाव
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्वसामान्य शेतकऱ्यांना तसेच कर्जदारांना सहजासहजी कर्ज मिळत नाही मात्र करोडो रुपये बुडवणाऱ्यांना ते सहज मिळते आणि ते त्यांचे माफ होते. देशभरातील बडे उद्योजक कसे कर्ज बुडवे आहेत आणि त्यांना कसे कर्ज माफ होते, आपण हे नेहमीच ऐकतो. सोलापूर जिल्ह्यातील कर्ज बुडविणाऱ्यांचा आकडा देखील वाढू लागला आहे. सोलापुरातील नामवंत उद्योजक अनिल पंदे यांच्या पंधे इंफ्रा. यांचे युनियन बँक कडील 341 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज थकले आहे . शिवाय अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर कडे याच बँकेचे 28 लाख 57 हजार कोटी रुपयांची कर्ज थकले आहे. वारंवार नोटीस देऊन देखील हे कर्ज न भरल्यामुळे आता युनियन बँकेने वरील दोनही मिळकती ताब्यात घेऊन त्यांचा 14 नोव्हेंबर रोजी जाहीर निलाव काढला आहे.

गोकुळ शुगर च्या 28 कोटी 57 लाख थकीत कर्ज प्रकरणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , त्यांच्या पत्नी सुवर्णा, मुलगा शिवराम यांच्या मालमत्ता बँकेने लिलावासाठी काढले आहेत. गोकुळ शुगर इंडस्ट्री थकीत कर्ज प्रकरणी गोकुळ शिंदे, दत्ता शिंदे, गणपत शिंदे, कल्पना शिंदे, प्रीती शिंदे, धीरज शिंदे, कपिल शिंदे, बलभीम शिंदे, अंजना शिंदे, लक्ष्मी शिंदे उषा शिंदे या सर्वांना जबाबदार धरून त्यांचे सात रस्ता येथील विद्याविहार सोसायटीमध्ये असलेले फ्लॅट तसेच इतर मालमत्ता वर टाच आणून त्याचा बँकेने लिलाव काढला आहे. आजच दैनिक सकाळ मध्ये या स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

शिवाय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्नी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील सात कोटी पंधरा लाखाचे आणि हर्षवर्धन पाटील त्यांची दोन मुले राजवर्धन आणि अंकिता यांच्या नावावर काढलेले सुमारे 15 कोटी रुपयांचे भारतीय स्टेट बँक शाखा मोहोळचे कर्ज थकले आहे. याप्रकरणी बँकेने हर्षवर्धन पाटील यांच्या शिवाजीनगर आणि कोरेगाव येथील मालमत्ता ताब्यात घेतले आहेत. साठ दिवसाची मुदत देऊन देखील त्यांनी कर्ज न भरल्यामुळे आता या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. युनियन बँकेचे 370 कोटी रुपयांचे तर एसबीआयचे 15 कोटी रुपयांचे कर्ज थकीत झाल्यामुळे आणि बड्या नेत्यांची नावे यात आल्यामुळे बँकिंग क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे

Previous Post

वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

‘कमळ’ आवडे सर्वांना..! माजी आमदार माने, राजन पाटील, शिंदेंचा बुधवारी प्रवेश..!

Next Post
‘कमळ’ आवडे सर्वांना..! माजी आमदार माने, राजन पाटील, शिंदेंचा बुधवारी प्रवेश..!

'कमळ' आवडे सर्वांना..! माजी आमदार माने, राजन पाटील, शिंदेंचा बुधवारी प्रवेश..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In