सोलापूर: शहरात सलग दुसऱ्या दिवशी गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला किराणा दुकान तसेच भाजी मंडई मध्ये तोबा गर्दी दिसून आली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज रात्री आठ वाजल्यापासून 15 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल वगळता सर्व प्रकारच्या अस्थापना बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे मात्र 14 मे रोजी रमजान असल्यामुळे मुस्लिम बांधवांना साहित्य खरेदी करण्यासाठी 11 आणि 12 मे रोजी पुन्हा यामध्ये शिथीलता देण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला आहे. प्रशासन अचानक काहीही निर्णय घेत असल्यामुळे भयभीत झालेले नागरिक दररोजच खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहेत त्यामुळे या लॉकडाऊनचा काय फायदा होणार हे येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे.










