• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2026
in मुख्य बातमी
0
पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
0
SHARES
1
VIEWS

मतमोजणी प्रक्रिया अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत यशस्वी करावी -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

पुणे : विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया नियुक्त सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत आणि ताणरहित पद्धतीने यशस्वी करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. या अनुषंगाने मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी तेली- उगले म्हणाल्या, मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्याचे काम केले आहे. मतमोजणीच्या फेरीदरम्यान शांततेत, चूक होऊ न देता आणि कोणतेही दडपण न घेता काम करावे. व्यवस्थित सर्व नमुने भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन, मदत देण्यात येईल. मतपत्रिका वैध अवैध बाबतचे मुद्दे, आक्षेप योग्यरित्या निकाली काढावेत.

मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक टेबलवरील पथकाने काळजीपूर्वक आणि अचूक काम करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. मतमोजणी प्रक्रियेत टेबलवरील पर्यवेक्षक, सहायक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे तेली-उगले यांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये, यासाठी आवश्यक नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करावा, असेही त्या म्हणाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदार संघातील मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि सह आयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदार संघातील अधिकाऱ्यांना मतमोजणीशी संबंधित बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. मत मोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या शंकांचे पलांडे व आनंदकर यांनी निरसन केले.

यावेळी मतमोजणीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार, वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या. मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, भरायचे विविध नमुने, मतपत्रिका वैध, अवैध अचूक वर्गीकरण करणे, प्रत्येक फेरीनुसार निकाल नमुना जमा करणे आदींसह मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सर्व सुविधा व नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली.

अशी होणार मतमोजणी
पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १०० टेबल असणार आहेत. यासाठी ५ कक्षात प्रत्येकी १० टेबलच्या २ रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी ४२ टेबल असणार आहेत. यासाठी ३ कक्षात प्रत्येकी ७ टेबलच्या २ रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई असा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.

Previous Post

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

Next Post

ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!
मुख्य बातमी

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

October 26, 2026
आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!
मुख्य बातमी

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय
मुख्य बातमी

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026
उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!
मुख्य बातमी

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
Next Post
ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026
ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

October 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026