९ मृतांमध्ये अठरा वर्षाच्या तरुणाचा समावेश…
सोलापूर : शहराचा 13 मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात नव्याने ८६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे याच कालावधीत ११९ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू ओढवला आहे. शहरातील प्रभागनिहाय बाधित रुग्णांची संख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक १५ रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन मध्ये १० रुग्ण आढळले असून इतर प्रभागांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. अक्कलकोट रोड परिसरातील किसान नगर येथील अठरा वर्षाच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही बाब चिंताजनक असून अजूनही कमी वयाचे तरुण तातडीने rt-pcr करून घेत नसल्याचे दिसून येत आहे.
