• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शनिवारी होणार सीएलएस सायक्लोथोन 2023 चा एक्स्पो कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2023
in इतर घडामोडी
0
शनिवारी होणार सीएलएस सायक्लोथोन 2023 चा एक्स्पो कार्यक्रम
0
SHARES
1
VIEWS
 शारदा प्रतिष्ठान ,सोलापूर संचलित सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून सीएलएस सायक्लोथोन 2023 या सायकल स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेचा एक्सपो कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी कार्यक्रम स्थळी म्हणजे बाळे येथील लक्ष्मीतरु मंगल कार्यालय येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे उपायुक्त व सायकलिस्ट डॉ. विजय कबाडे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते  सायकलिस्ट स्पर्धकांसाठी देण्यात येणाऱ्या गुडी बॅगचे अनावरण व वितरण करण्यात येईल. याशिवाय सोलापुरातील आयरन मॅन, लोहपुरुष, व विशेष कामगिरी केलेल्या सायकलिस्ट यांचे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धक सायकलिस्ट यांना टाइम टॅग देऊन त्यांच्या सायकलची तपासणी व आवश्यक दुरुस्ती सायकल दुकानदार अविनाश कुरापती व माणिक बाईक स्टुडिओचे स्वप्निल नाईक यांचेकडून एक्स्पो च्या ठिकाणी करण्यात येणार आहे. 

  रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा 25 किमी आणि 50 किमी अंतराच्या दोन गटात होणार असून टाईम मशीन द्वारे प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेचे मूल्यमापन करून स्पर्धेत अव्वल येणाऱ्या स्त्री-पुरुष कॅटेगरीतील सायकल स्पर्धकांची नावे स्पर्धा पूर्ण होताच जाहीर केली जातील. विजेत्या स्पर्धकांना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

फिटनेस चांगला ठेवण्यासाठी आरोग्यदायी तसेच पर्यावरण पूरक व सुरक्षित व्यायाम प्रकार म्हणून सायकलिंग ला प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षापासून सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून विविध उपक्रमाद्वारे सायकलिंग चे महत्व अधोरेखित करणारे उपक्रम राबवले गेले आहेत. कोरोना काळात लोकांना याचे महत्त्व समजले आहे त्यामुळे सोलापुरात सायकलिंग कम्युनिटी वाढत आहे. यंदाच्या स्पर्धेला सोलापूर सह पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर माढा आदी विविध सायकल क्लबच्या सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला आहे. त्यामुळे ही स्पर्धा उत्तमरीत्या पार पडण्यासाठी सायकल लवर्स सोलापूरचे सदस्य चंद्रकांत दुधाळ, बालाजी सुरवसे, इंजिनिअर अद्वैत लवटे, प्रभाकर चव्हाण, प्रदीप कदम यांची टीम परिश्रम घेत आहे. सोलापूरकरानी ही स्पर्धा अनुभवण्यासाठी व स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक महेश बिराजदार ,इंजिनियर अमेय केत, डॉक्टर प्रवीण ननवरे,अविनाश देवडकर,प्रवीण जवळकर यांनी केले आहे.
Previous Post

दि. 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रमाची राज्यस्तर दखल – आयुक्त मांडरे

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रमाची राज्यस्तर दखल – आयुक्त मांडरे

सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रमाची राज्यस्तर दखल - आयुक्त मांडरे

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026