• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 10, 2026
in इतर घडामोडी
0
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी
0
SHARES
3
VIEWS

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक दर्शन घेतले

पंढरपूर- महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले.

चंद्रभागा घाट परिसराची पाहणी
मुख्य सचिव अग्रवाल यांनी प्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नदीपात्र स्वच्छता, भाविकांसाठी स्नान सुविधा, प्रकाश व्यवस्था तसेच घाटावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आषाढी-कार्तिकी वारीतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या. तसेच यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन भाविक, वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व प्रस्तावित कॉरिडॉर
त्यानंतर अग्रवाल यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत 73 कोटीच्या निधीतून झालेल्या मंदिर विकास, सुशोभिकरण कामांची पाहणी ही त्यांनी केली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रस्तावित श्री क्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत माहिती दिली. यामध्ये मंदिर परिसरातील भाविकांसाठी सुलभ दर्शन मार्ग, प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग व अत्याधुनिक सुविधा तसेच भक्त निवास, बहुमजली पार्किंग, प्रसादालय, माहिती केंद्र, वैद्यकीय मदत कक्ष, वृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष मार्ग. सुरक्षा व नियोजन: गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्रणा. आदी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग व पंढरपूर शहर व परिसरात गर्दी नियंत्रणासाठी व वाहतूक नियमासाठी पोलीस प्रशासनाकडून वापरण्यात आलेल्या ए.आय तंत्रज्ञानाबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

प्रस्तावित विकासकामे, भाविकांच्या सुविधा आणि परिसराच्या एकात्मिक नियोजनाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिवांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व समन्वयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी व भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्य सचिव अग्रवाल यांचा सत्कार केला.

यावेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुंटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

Next Post

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

Related Posts

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक
इतर घडामोडी

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
Next Post
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन - शंकर गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

August 11, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026