• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील उड्डाणपूल तसेच पाणीपुरवठा आदी विविध विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी महापालिका सभागृहात घेतली बैठक…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरातील उड्डाणपूल तसेच पाणीपुरवठा आदी विविध विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी महापालिका सभागृहात घेतली बैठक…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सभागृहात आज मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जुना पुणे नाका ते पत्रकार भवन उड्डाणपूल आणि जुना बोरमणी नाका ते मोरारजी बंगला उड्डाणपूल या दोन्ही प्रस्तावित उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी बाधित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या जागांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) हसन गौहर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, एमआयडीसी अक्कलकोट रोडचे अध्यक्ष तिलकचंद शहा, एमआयडीसी अधिकारी एस.टी. राठोड तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उड्डाणपुलांच्या मार्गात येणाऱ्या आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या शासकीय विभागांच्या मालकीच्या जागांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. या विभागांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा दूध संघ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पोस्ट ऑफिस, मध्य रेल्वे विभाग, बीएसएनएल टेलिकॉम सर्व्हिसेस, पोलीस आयुक्त (शहर) कार्यालय, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय, डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेज आदींचा समावेश आहे.

बैठकीदरम्यान प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व संबंधित विभागांना बाधित होणाऱ्या जागेचा त्वरित तपशील, ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तसेच प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे उड्डाणपुलांच्या कामाला वेग येईल आणि प्रकल्पाच्या मंजुरी प्रक्रियेत विलंब होणार नाही.

तसेच या बैठकीत शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि नवीन उड्डाणपुलांच्या बांधकामासोबत समन्वय राखण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांसोबत देगाव येथील एसटीपी (पाणी प्रक्रिया प्रकल्प) संदर्भात चर्चा झाली. या चर्चेत शहरातील सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर यासंबंधीची पुढील कार्यवाही निश्चित करण्यात आली.

बैठकीच्या शेवटी प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व विभागांना एकत्रितपणे कार्य करून प्रकल्पाची गतीमान अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. उड्डाणपुलांच्या कामामुळे सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेत दक्षता जनजागृती सप्ताहाच्याअनुषंगाने आज शपथ घेण्यात आली…

Next Post

दुष्काळी सोलापूर जिल्हा बनला पाणीदार जिल्हा .. भूगर्भातील पातळी वाढली ..!

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
दुष्काळी सोलापूर जिल्हा बनला पाणीदार जिल्हा .. भूगर्भातील पातळी वाढली ..!

दुष्काळी सोलापूर जिल्हा बनला पाणीदार जिल्हा .. भूगर्भातील पातळी वाढली ..!

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026