• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार? अमित शाहांच्या उपस्थितीत होणार बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2023
in मुख्य बातमी
0
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार? अमित शाहांच्या उपस्थितीत होणार बैठक
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (19 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात असणार आहेत.

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.  

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याकडे शिंदे फडणवीस सरकारचा विचार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारच होत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिंदे गटामध्ये उत्साह संचारला असून त्यामुळे मंत्रिमंडळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अमित शाह उद्या कोल्हापुरात 

दुसरीकडे, अमित शाह यांची सासूरवाडी कोल्हापूर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अमित शाह यांचे कोल्हापूर कनेक्शन म्हणजे त्यांच्या पत्नी सोनल शाह या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. म्हणजेच अमित शाह कोल्हापूरचे जावईबापू आहेत. त्यामुळे होम मिनिस्टरांच्या आग्रहामुळे अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) कोल्हापूरमध्ये येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया शाळेमध्ये शिकल्या आहेत. सोनल शाह यांचे पाहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले आहे. त्यामुळे आजही सोनल शाह आपल्या मित्र मैत्रिणींच्या संपर्कात आहेत. त्यांना आजही शाळेबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे सोनल भाभी ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेच्या संस्थेचं यंदा शताब्दी वर्ष साजरे होत आहे.

त्यामुळे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सोनल भाभी यांनी अमित शाह यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे अमित शाह केंद्रीय होम मिनिस्टर असले, तरी घरच्या होम मिनिस्टरांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कौटुंबिक आणि भावनिक किनार आहे. या शाळेसाठी अमित शाह आणि सोनल शाह यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आहे. म्हणूनच शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाला अमित शाह यांच्यासारखा दुसरा पाहुणा नाही असे देखील मत शाळेने व्यक्त केलं आहे. 

Previous Post

मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा…

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांनी केली बक्षी समितीच्या अहवालाची होळी

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांनी केली बक्षी समितीच्या अहवालाची होळी

सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांनी केली बक्षी समितीच्या अहवालाची होळी

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026