पुणे-सोलापूर महामार्गावर मोडनिंब गावाजवळ सोलंकरवाडी फाटा येथे भरधाव इनोवा कारची दुचाकीला समोरून जोरदार धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
सोलापूर : दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब गावाजवळ सोलंकरवाडी फाटा येथे एका भरधाव वेगाने सोलापूर वरून पुणे येथे जात असलेल्या एका इनोवा कार क्रमांक MH 14 FX 2458 ने मोडनिंब येथून अरण येथे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 BK 8206 ला समोरूनजोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पुरुषाचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला असून या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. अक्षय लोखंडे आणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव यांनी मोडनिंब येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्थीपथक प्रमुख संतोष खडके , सहाय्यक स्वप्नील शिंदे, चालक बंडू गायकवाड आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण औताडे (PSI) आणि कर्मचारी अत्तार (HC) , मुलानी (HC) , सरडे (PC) , माने (PN) हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पुरुषाचे नाव अर्जुन तुकाराम वाघमारे वय ५७ वर्षे रा अरण ता माढा जि सोलापूर असून या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.
























