• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या सोलापूर दौरा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 11, 2023
in मुख्य बातमी
0
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या सोलापूर दौरा
0
SHARES
0
VIEWS

‘महाबैठक’ घेऊन कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी (दि.१२) सोलापूर दौऱ्यावर आहेत. शहर जिल्हा भाजपतर्फे आयोजित महाबैठकीस प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे संबोधित करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता हेरिटेज मंगल कार्यालयात शहर जिल्हा भाजपची महाबैठक होणार आहे. यावेळी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. रणजीतसिंह मोहिते – पाटील, माजी आ. प्रशांत परिचारक, आ. राजेंद्र राऊत, आ. राम सातपुते, आ. समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपाच्या महाबैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. भाजप सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवून जनतेच्या मागण्या पक्षामार्फत सरकारपर्यंत पोहचविण्याचे कार्य आणखी गतीने करण्याबाबत यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सूचना करणार आहेत.

याशिवाय शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बलिदान चौक येथे युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन होणार आहे. तर सकाळी ११.४५ वाजता शिवस्मारक सभागृहात सामाजिक एकत्रीकरण बैठकीस उपस्थित राहून प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दुपारी १२.४५ वाजता विजयपूर रस्त्यावरील इंदिरा सभागृह येथील आदर्श बूथला ते भेट देणार आहेत. यानंतर दुपारी १.४५ वाजता व्यापारी उद्योजकांसह आयएमए हॉल येथे भोजन घेणार आहेत. तर दुपारी ४.३० वाजता हेरिटेज लॉन येथे सोशल मीडिया बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या महाबैठकीनंतर सायंकाळी ७.३० वाजता शहर व ग्रामीण कोअर कमिटीची बैठक हेरिटेज लॉन येथे होईल. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी आणि शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केले आहे.

Previous Post

काय डोंगर, काय हिरवळ वाट पाहतोय तुमची ‘नरहरी झिरवळ’, राऊतांचं ट्वीट

Next Post

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे जबरदस्त रेड गाऊन फोटोशूट!

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे जबरदस्त रेड गाऊन फोटोशूट!

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे जबरदस्त रेड गाऊन फोटोशूट!

ताज्या बातम्या

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून

ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026