• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

चंदाताई तिवाडी,डॉ. मिनल चिडगुपकर,सरिता मोकाशी आदींना शरद – प्रतिभा प्रतिष्ठाचे पुरस्कार जाहीर

by Yes News Marathi
June 22, 2021
in मुख्य बातमी
0
चंदाताई तिवाडी,डॉ. मिनल चिडगुपकर,सरिता मोकाशी आदींना  शरद – प्रतिभा प्रतिष्ठाचे पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा होणार सन्मान

सोलापूर – सोलापूरच्या विकासा बरोबरच सांस्कृतिक, क्रिडा, वैदयकिय, सामाजिक, शैक्षणिक विषयांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने ‘शरद – प्रतिभा’ प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोलापूरकरांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.


‘शरद-प्रतिभा’ प्रतिष्ठान सोलापूरच्यावतीने संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूरच्या विकासात योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील महिलांचा ‘शरद – प्रतिभा’ पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरुप आहे. याबाबत अधिक माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर आणि सचिव दिपक राजगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी महापौर मनोहरपंत सपाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, प्रख्यात डॉक्टर डॉ. मिलींद शाहीर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमात सोलापूरातील गरीब व गरजू 52 शाळकरी मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सॅक (बॅग), वह्या, कंपास आदींचा समावेश आहे.
शुक्रवार 25 जून रोजी दुपारी 3 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर जवळील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात कोविडचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे.
कोविड मध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची गरज ओळखून 30 जून रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल सिटी पार्क येथील शामियाना हॉल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


— पुरस्कार प्राप्त मान्यवर महिला —
सामाजिक क्षेत्र – सरिता मोकाशी
सांस्कृतिक क्षेत्र – चंदाताई तिवाडी
वैदयकिय क्षेत्र – डॉ. मिनल चिडगुपकर
कृषी क्षेत्र – मनिशा भांगे
शिक्षण क्षेत्र – मिनाक्षी कदम
उदयोग क्षेत्र – सब्जपरी मकानदार.

या पत्रकार परिषदेस चंद्रकांत पवार, मंजिरी अंत्रोळीकर, प्रियवंदा पवार, रियाज पिरजादे, निलेश धोत्रे, लखन गावडे, सिद्धार्थ सर्वगोड, दयानंद पोतदार, सुनील माने उपस्थित होते.


सांस्कृतिक क्षेत्र –
चंदाताई तिवाडी
चंदाताई तिवाडी या गेल्या चाळीस वर्षापासून भारुडाचे सादरीकरण करीत आहेत. या भारुडाच्या माध्यमातून त्या समाज प्रबोधनाचे काम करतात. संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अतिशय खडतर जीवन प्रवास करीत चंदाताई तिवाडी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना आतापर्यंत देषपातळी पर्यंतचे शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच त्यांच्या जीवनावरील भारुडातील वादळ चंदाताई या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे.

सामाजिक क्षेत्र –
सरिता मोकाशी
आणीबाणी नंतर १९७७ साली सामाजिक कार्यास सुरवात केली. रेल्वेमध्ये नोकरी करत असताना मजदूर युनियन च्या माध्यमातून महिलांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविले. सेवानिवृत्तीनंतर महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये वकिली करून न्याय मिळवून दिला.

वैदयकिय क्षेत्र –
डॉ. मिनल चिडगुपकर
डॉ. मिनल चिडगूपकर या सोलापूरातील प्रसिध्द गायनॉकलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांना सामाजिक काम करताना वेळ कमी मिळतो. परंतु त्यातूनही मिनल चिडगूपकर यांनी शालेय विदयार्थिनींमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक शाळांमध्ये जावून मुलींमध्ये येणारी मासिक पाळी, त्यासंबंधी उदभवणारे आजार, त्याचे निराकरण यावर प्रबोधन केले.

कृषी क्षेत्र – मनिषा भांगे
62 वर्शीय मनिषा भांगे या मूळच्या माढा तालुक्यातील खैरेवाडी येथील रहिवासी आहेत. 3 गुंठे म्हणजेच साधारण 3 हजार स्क्वेअर फूटात 25 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारची फळझाडे, 15 औषधी वनस्पती, 12 फुलझाडे, 6 वनझाडे लावण्याचा त्यांचा विक्रम आहे. त्याच बरोबर त्यांनी देशी बियाणांची बॅंक सुरु केली आहे.

शिक्षण क्षेत्र –
डॉ. मिनाक्षी कदम
डॉ. मिनाक्षी कदम या मूळच्या मंगळवेढा तालुक्यातील आहेत. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापिठाच्या सिनेट सदस्य आहेत. न्यु इंग्लिष स्कूल या संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्याच्या पाच शाखा कार्यरत आहेत. त्यांनी विदयार्थीनींसाठी लेडिज हॉस्टेल उभारले आहे. अनेक गरीब आणि गरजू विदयार्थिनींना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

उदयोग क्षेत्र –
सब्जपरी मकानदार.
मूळच्या मंगळवेढा तालुक्यातील सब्जपरी मकानदार यांचे शिक्षण जेमतेम झालेले.मंगळवेढामध्ये त्यांनी वीट उत्पादनाला सुरुवात केली. शिक्षण नसतानाही अनुभवाच्या जोरावर वीट व्यवसायाला उदयोगाचं स्वरुप दिलं. या उदयोगाच्या माध्यमातून 1 हजार महिलांना रोजगार दिला. लाखो रुपयांची उलाढाल त्या स्वतः पहातात. हा उदयोग व्यवसाय सांभाळून त्या सामाजिक कामातही अग्रेसर आहेत.

Previous Post

गायक मोहंम्मद अयाज यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

Next Post
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group