सोलापूर-माजी नगरसेवक कै. शंकरसिंग धनसिंग कैय्यावाले यांच्या स्मरणार्थ प्रभाग क्रमांक 17 ड चे नगरसेवक रवी शंकरसिंग कैय्यावाले यांच्या सन 2020– 21 च्या भांडवली निधीतून रुग्णवाहिका घेण्यात आली असून त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख व महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सभागृहनेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक रवी कैय्यावाले, नगरसेवक भरतसिंग बडूरवाले, नगरसेवक सुनील कामाटी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.