राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी बंदचा इशारा देण्यात आला असून सोलापुरातील सर्व बाजार समितीचा या बंदमध्ये सहभाग असणार आहे.

पुना मर्चंट्स चेंबर पुणे येथे राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खाद्यान्य वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समस्या, केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय बाजार धोरणातील अडचणी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करणे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने 5 डिसेंबर रोजी राज्यभरातील व्यापारी लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

