सोलापूर : आम आदमी पक्षाच्या पालक संघातर्फे सोमवारी ‘माझा पाल्य माझी जबाबदारी’ हे अभियान राबवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. खाजगी शाळा सध्या मनमानी पद्धतीने फी वसूल करीत आहेत. यंदादेखील कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना शाळा कधी सुरू होणार याची खात्री नसतानाही खाजगी शाळा फी भरल्याशिवाय गेल्या वर्षी चा निकाल देण्यास टाळाटाळ करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा या वेळी पालकांनी दिला.










