येस न्युज मराठी नेटवर्क । चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारने पालघरमधील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या जंगलात नेऊन नौदल अधिकारी सुरजकुमार मिथिलेश दुबे (२७, रा. झारखंड, रांची) यांना शुक्रवारी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी दुबे यांना आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. भारतीय नौदलात २००१मध्ये सीबिंग सी-मॅनपदी रूजू झालेले दुबे ३१ जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहोचले. तेथे तीन अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले.