मुंबई : ‘केजीएफ’ सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागचे पहिले टीझर प्रदर्शित झाले आहे. सुपरस्टार अभिनेता यशने काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी ‘केजीएफ’या चित्रपटाचे टीझर शेअर केले होते याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता यश लवकरच चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज करणार आहे. टीझरला मिळालेल्या प्रतिसादामुळे यश आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांना सुखद धक्काच बसला आहे. आता दोघेही पुढील टीझर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. पहिल्या टीझरला मिळालेला प्रतिसाद पाहून आता हा चित्रपट इंटरनॅशनल रिलीजचा प्लॅन करणे सुरू आहे.
सुरूवातील चित्रपटाच्या भारतात 2000 प्रिंट्स जाहीर केला होत्या, आता त्या दुप्पट करण्यात येणार आहेत. कन्नड, हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषेतच हा चित्रपट प्रदर्शित होणार नसून आता हा चित्रपट बऱ्याच विदेशी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी यशने चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये यशच्या तोंडात सिगारेट आहे आणि एका हाताने काहीतरी जड ओढून उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. हे पोस्टर शेअर करताना यशने लिहिले होते की, ‘साम्राज्याला पुन्हा तयार करताना’